Breaking News

सर्व कार्यालयीन प्रमुखांनी आगोदर कर्मचा-यांकडे लक्ष द्यावे-आ.बाळासाहेब आजबे

कामात हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाहीके. के. निकाळजे । आष्टी 

तालुक्यातील प्रत्येक कार्यालयाची आवस्था ही अत्यंत बिकट झाली असून,कार्यालयीन प्रमुखांचेच लक्ष कर्मचा-यांकडे नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.जर अधिकारी व कर्मचा-यांनी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला तर त्यांची गय केली जाणार नसल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

      आष्टी तहसिल कार्यालयातील सभागृृृहात आज सोमवार दि.19 रोजी दुपारी 12 आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ.आजबे बोलत होते.यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम,नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,तालुका कृृृृृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, काॅग्रेस तालुकाध्यक्ष विनोद ढोबळे,काकासाहेब शिंदे,किशोर हंबर्डे,आण्णासाहेब चौधरी,डाॅ.शिवाजी राऊत यांच्यासह आदि व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,सध्या तुरीचे नुकसान कमी आहे.परंतु कापूस,बाजरी यासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यासाठी प्रत्येक गावात कृृृृषी सहाय्यकांनी दररोज जाणे गरजेचे आहे.तसेच विद्युत कर्मचारीही आपल्या कर्तव्यावर जात नाहीत त्यामुळे कार्यालयीन प्रमुखाने आपला कर्मचारी कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी गेला त्या ठिकाणचा जीओ टॅकने फोटो मागविणे बंधनकारक करण्याच्याही सुचना यावेळी त्यांनी दिल्या.

तसेच प्रत्येक शेतक-यांना पिकविमा कोणत्या पिकाचा उतरावा,कोणते पिके घ्यावी याची माहिती प्रत्येक कृृृृृषीसहाय्यकांनी देणे गरजेचे आहे.यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे म्हणाले,तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीचा जवळपास 15 व्या वित्त आयोगातून 56 कोटी रुपायांचा निधी दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असून सर्व कामे व्यवस्थित व नियमबाह्य करण्याचे आदेश देण्यात ग्रामसचिवांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तालुकाकृृृृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सध्या पिकांची स्थिती व शेतक-यांनी झालेल्या पिकांचे नुकसान आॅनलाईन करावे तसेच आत्तापर्यत तालुक्यातील 29 शेतक-यांनी आपले नुकसान झाल्याची आॅनलाईन माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.याच्यासह महावितरण,भूमिअभिलेख, जलसिंचन विभाग,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम,पाणि पुरवठा विभाग यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


No comments