शेतीचा वाद : ४ एकरातील सोयाबीन जाळून टाकले, सहा विरोधात गुन्हा दाखल
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील कुठे येते शेतीच्या भांडणातून काढणी करून मळणीसाठी ठेवलेले चार एकर क्षेत्रातील एक लाख रु.चे सोयाबीन जाळून टाकले असून याप्रकरणी हेच पोलीस स्टेशनला सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील कोटी येथे किसन ज्ञानोबा डोंगरे यांच्या मालकीच्या गट नंबर ४२ मधील ३ एकर ३९ गुंठे या क्षेत्रातील सुमारे एक लाख रु किंमतीचे शेतातील सोयाबीन; हे किसन डोंगरे यांची पत्नी सौ. अल्का डोंगरे व वडील ज्ञानोबा डोंगरे या दोघांनी मळणीसाठी कापणी करून ठेवलेले एक होते. दि. ५ ऑक्टोबर सोमवार रोजी पहाटे ५:०० वा. च्या सुमारास शेजारी शेत असलेले श्रीहरी मोहन डोंगरे, सविता श्रीहरी डोंगरे, ऋषीकेश श्रीहरी डोंगरे, शंकर भाऊराव डोंगरे व सूखमला शंकर डोंगरे डोंगरे सर्वजण रा. कोठी या सहा जणांनी संगणमत करून जाळून टाकले.
या प्रकरणी किसन डोंगरे यांची पत्नी सौ. अल्का डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार केज पोलीस स्टेशनला श्रीहरी मोहन डोंगरे, सविता श्रीहरी डोंगरे, ऋषीकेश श्रीहरी डोंगरे, शंकर भाऊराव डोंगरे व सूखमला शंकर डोंगरे डोंगरे या सहा जणां विरुद्ध गु.र.नं. ४२७/२०२० हा भा.दं.वि. ४३५,५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंढे हे करीत आहेत.
या पूर्वी दि.२३ जून रोजी ही शेत नांगरणीच्या कारणावरुन यांच्यात भांडण झाले होते. त्या सहा जणांच्या विरुद्ध गु.र.नं. २३३ भा.दं.वि. ३०८, ३२४, ३२३, ३२७, ४५२, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
No comments