Breaking News

बीडचे महिला मारहाण प्रकरण; पोलिसांचा तपास संशयास्पद तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे द्या ः अ‍ॅड.संगिता चव्हाणबीड :  शहरातील पुजारी भगिनींना झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निद्रिस्त पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेने शहर हादरले मात्र पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतलेला नसून संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे हा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे द्यावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगीता चव्हाण यांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मारहाण प्रकरणातील महिला आरोपीस अटकपूर्व एका दिवसात जामीन मंजूर झाला. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला नाही. मुलींवर साळवे कुटुंबियांनी खुनी हल्ला केला. महिलांवर खाली पाडून मारहाण केलेली असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला केला नाही. संबंधित तपास पोलिस अधिकारी पीडित महिलांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत. यामुळे पोलिसावर आमचा संशय असून हा तपास वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड.संगिता चव्हाण यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

सबंधित प्रकरणांमध्ये पुजारी भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोरेसंपर्कप्रमुख बीड संपर्कप्रमुख आनंदजी जाधव व महिला संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देणार असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे अ‍ॅड.चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. उपस्थित शिवसेना पदाधिकारी उपजिल्हासंघटक फरजाना शेख, उपशहर रेखा वडमारे, उपशहर संगीता वाघमारे, उपशहर ललिता आढाणे यांनी केली. 


No comments