Breaking News

दुष्काळात तेरावा महिना.. नोकरी गेली अन कर्जस्थगिती काळात व्याज झाले दुप्पट... बेरोजगार झाले हैराण ...

 

राजू जोगदंड । बीड करोना संकटकाळात कर्जदारांना दिलासा देण्यासाठी हप्त्याच्या स्थगितीचा निर्णय घेण्यात आला होता. पण, ती स्थगितीच आता कर्जदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या स्थगितीच्या काळातील हप्त्यावरील व्याजाची रक्कम स्थगिती हटल्यानंतर दुप्पट झाली असून लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र दुप्पट व्याजाचा हप्ता भरावा कसा याच प्रश्नांने बेरोजगार कर्जदार हैराण झाले आहेत. 

करोना संकटकाळात कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून हप्तास्थगिती योजना आणली होती. त्याअंतर्गत प्रारंभी एप्रिल ते जून व त्यानंतर जुलै-ऑगस्ट, असे पाच महिने कर्जाचा हप्ता कर्जदारांनी भरला नाही तरी चालेल, अशी मुभा देण्यात आली. लाखो कर्जदारांनी या सुविधेचा लाभ घेतला. पण, सप्टेंबरपासून कर्जभरणा नियमित सुरू झाल्यानंतर त्यातील मुद्दलाची रक्कम कर्जहप्त्याच्या स्थगितीपेक्षाही कमी झाली असून, व्याजाची रक्कम वाढली आहे. 


मात्र या पाच महिन्यांच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या कोरोनाने हिरावून घेतल्या आहेत. यामुळं बेरोजगार झालेल्या तरुणांना कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या प्रश्नासह बँकेच्या कर्जाचा हप्त्याचा भरणा कसा करावा याच प्रश्नचं काहूर त्यांच्या मनात उठलं आहे. घर बांधण्यासाठी, वैयक्तीक व चार चाकी वाहनांसाठी अनेकांनी कर्ज घेतले आहेत. या कर्जाच्या हप्त्यासाठी बॅंकेकडून कर्जदारांकडे तगादा लावला जात असून बँकेकडून त्यांना हप्त्यासाठी नोटीसा वकिलांन मार्फत  बजावण्यात आल्या असून त्याचा अतिरिक्त खर्च ही कर्जदारांच्या माथी मारण्यात आला आहे. 

 करोना संकटकाळात कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून हप्तास्थगिती योजना आणली. मात्र तीच योजना आता नोकरदारांच्या जीवावर उठली असून नोकरी गेली, कर्जाचा हप्त्यासाठी बँकेचे कर्मचारी कर्जदारांना मानसिक त्रास देत आहेत. शिवाय हप्ता  भरण्यासाठी कुठून पैसा आणावा या प्रश्नांने बँकेचे कर्जदार चक्रावून गेले आहेत. आशा संकट काळात केंद्र सरकार हस्तक्षेप करून जशी हप्तास्थगिती योजना आणली. तशी सवलत योजना आणलं काय असा सवाल यानिमित्ताने समोर आला आहे. No comments