Breaking News

एकता फाउंडेशन शिरूरतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर कासार 



शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे एकता फाउंडेशन, शिरूर कासार यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसरे एकता मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम स्थळी एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली तेव्हा नागनाथ संस्थान, मानूर चे मठाधिपती १०८ ष.ब्र.शिवाचार्य मानूरकर महाराज आणि रेणूका विद्यालयाचे प्राचार्य शशिकांत गायकवाड, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव तथा पत्रकार गोकुळ पवार यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा.डाॅ.भास्कर बडे, फाउंडेशनचे कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर, सहसचिव शिवव्याख्याते कैलास तुपे, उपाध्यक्ष माही शेख आणि राजेश बीडकर यांनी संमेलनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुढील राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली.

कै.विश्वनाथ यादव कराड (गुरूजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, कै.विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि.पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, स्वा.सै.गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, लोणी ता.शिरूर का.जि.बीड राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, कै.काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, कै. काॅम्रेड टी.डी.शेलार (कामगार योद्धा) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, म.शेख चाँद शेखलाल (निवृत्त पोलिस) राज्यस्तरीय उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, 


कै. परमेश्वर भागुजी कैतके राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन/संपादन साहित्य पुरस्कार, कै. के. टी. तांदळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संकिर्ण (अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णन सह इतर) साहित्य पुरस्कार, वरील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पुढील साहित्य/ वाङ्मय प्रकारातील साहित्यकृती मागविण्यात येत आहेत.

१) कथा, २) कविता, ३) कादंबरी, ४) बालसाहित्य (सर्व प्रकार), ५) ललित लेखन, ६) गझलसंग्रह, ७) संशोधन/संपादित साहित्य, ८) संकिर्ण (वरील साहित्यप्रकार वगळून अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णन यांसह इतर सर्व) कै.विश्वनाथ यादव कराड (गुरूजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार आणि कै. विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि.पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह या पुरस्कारांसाठी ०१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह आणि काव्यसंग्रह ही पुस्तके पात्र आहेत. 

         

तसेच, स्वा.सै.गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, लोणी ता.शिरूर का.जि.बीड राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, कै.काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, कै.काॅम्रेड टी.डी.शेलार (कामगार योद्धा) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, म.शेख चाँद शेखलाल (निवृत्त पोलिस) राज्यस्तरीय उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, कै.परमेश्वर भागुजी कैतके राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन/ संपादन साहित्य पुरस्कार आणि कै. के. टी. तांदळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संकिर्ण (अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णनासह इतर सर्व) साहित्य या पुरस्कारांसाठी ०१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेले कादंबरी, बालसाहित्य (सर्व प्रकार), ललित लेखन, गझलसंग्रह, संशोधन, संपादन आणि संकिर्ण अंतर्गत येणारी (अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णनासह इतर सर्व साहित्य) ही पुस्तके पात्र आहेत.

पुरस्काराचे स्वरूप :- ११११/- रूपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार, गुलाबपुष्प आणि श्रीफळ असे राहिल. पुरस्कार निवड समितीद्वारा पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींची घोषणा झाल्यानंतर सदर पुरस्कार प्राप्त पुस्तकांच्या लेखक, कवी, कथाकार, साहित्यिकांना निवडपत्र पाठवून आणि भ्रमणध्वनीद्वारेही तसे अवगत केले जाईल. पुरस्कारार्थींना सदर राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण तिसरे एकता मराठी साहित्य संमेलन, मानूर येथील कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक केले जाईल. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संमेलनाच्या दिवशी कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पुरस्कार स्विकारता येईल. प्रतिनिधींकडे अथवा पोस्टाने पुरस्कारांचे वितरण केले जाणार नाही. यंदाचे वर्ष हे राज्यस्तरीय पुरस्कारांचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी दुसर्‍या एकता मराठी साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना एकता फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले होते.

पुस्तक परीक्षण समिती आणि त्यानंतर पुरस्कार निवड समिती या दोन समितीवरील माननीय परीक्षांकडून राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी योग्य त्याच पुस्तकांची निष्पक्षपातीपणे निवड केली जाते. पुरस्कार निवडी संदर्भातील एकता फाउंडेशनने नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. तरी, वरील कालावधीत ज्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अशा महाराष्ट्रभरातील कवी, कथाकार, कादंबरीकार, लेखक, संशोधक, संपादक, साहित्यिकांनी आपल्या पुस्तकाच्या तीन प्रती, स्वतःचा पासपोर्ट फोटो आणि परीचयपत्र पुढील पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावे असे आवाहन एकता फाउंडेशनचे सदस्य व्यंगचित्रकार दिपक महाले, नितीन कैतके, हरिप्रसाद गाडेकर, अॅड भाग्यश्री ढाकणे, श्रीमती रंजना फुंदे, श्रीमती मिरा दगडखैर, डाॅ.सचिन सानप, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

साहित्य पाठविण्याचा पत्ता -


साहित्यिक अनंत कराड (अध्यक्ष - एकता फाउंडेशन, शिरूर कासार)

"निर्मल सदन" भगवान चौक, 

बीड - रोड, शिरूर कासार. 

ता. शिरूर कासार, जि. बीड.

पिन - ४१३२४९.


अधिक माहितीसाठी : ७४९९२०३५१०, ९८८१००४४२२, ८८८८४०३९९५, ९७६४४०७०३०, ९९२२३१५८४८ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

No comments