Breaking News

आरक्षण पेच व समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी पुण्यात मराठा विचारमंथन बैठक - आ विनायक मेटेपुणे :  मराठा आरक्षण पेच व समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी 'मराठा' विचारमंथन बैठकीचे आयोजन दि ३ ऑक्टोबर २०२० रोजी पुणे येथील शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, म्हात्रे पूल, कर्वेनगर येथे करण्यात आले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाबाबत समाजबांधव चिंतेत आहेत. मराठा आरक्षण व समाजाच्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी म्हणून आ विनायक मेटे यांनी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.


    
 सध्या राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत, आपोपल्या पद्धतीने, माहितीनुसार, ज्ञानानुसार बोलत राहतात, मागण्यांमध्ये एकवाक्यता नाही, सर्वत्र समन्वयाअभावी वैचारिक सैरभैर वक्तव्य सुरु आहेत. सर्वांना एकत्र आणावे, दिशा मिळावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यभरातून मराठा आरक्षण चळवळीतील नेते, अभ्यासक, लोकप्रतिनिधी आमंत्रित असून या बैठकीचे आ विनायक मेटे हे निमंत्रक आहेत. बैठकीचे शुभारंभ लॉन्स येथे आ विनायक मेटे साहेब यांनी पाहणी करत नियोजनात्मक आढावा घेतला. यावेळी भरत लगड, तुषार काकडे, किरण ओहाळ यांच्यासह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

No comments