Breaking News

वडवणी पोलीस ठाण्याला लागलेली 'टाक' निवाची किड गेली


वडवणी तालुका पत्रकार संघ व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मागणीला आले यश

जगदीश गोरे । वडवणी 

     वडवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक महेश टाक यांची बदली झाल्याने वडवणीकरांनी सुटकेचा श्वास सोडल आहे. वडवणी शहरात तसेच तालुक्यात त्यांच्या कारकिर्दीत अवैध धंदे व पोलीस ठाण्यात येण्या-या जनसामान्यांवर अन्याय अत्याचार वाढला होता. म्हणुन वडवणी तालुका पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे बदलीची मागणी केली होती. त्यांची बदली झाल्याने ‘वडवणी पोलीस ठाण्याची "टाक" नावाची किड गेली’ असे शहरात बोलले जात आहे.

      

वडवणी हा मोठ्या संघर्षातुन ऊभा राहीलेला तालुका आहे. या तालुक्याच्या संघर्षाला इतिहास आहे. तालुका निर्मितीसाठी येथील आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलल्या आहेत. त्यानंतर तालुक्याची निर्मिती झाली. तहसील, पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी, न्यायालय, प्रा. आ. केंद्र, पोलीस ठाणे असे बोटावर मोजण्याएवढे कार्यालय सोडले तर अनेक कार्यालय भाड्याच्या जागेत आहेत. दोन कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी असलेल्या पोलीस चौकीचे आज भव्यदिव्य पोलीस ठाणे दिमाखात ऊभे आहे. तीन अधिका-यासह 45 कर्मचा-यांचा स्टाफ आहे. मात्र त्याठिकाणी वडवणीकरांना न्याय मिळण्या एैवजी प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. ठाण्याच्या निर्मितीपासुन ते आजपर्यंत सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश यांच्यासारखा भ्रष्ट अधिकारी ठाण्याला लाभला नाही. त्यांची बदली झाली अन् 'वडवणी पोलीस ठाण्यातुन 'टाक'नावाची किड गेली' असे अनेकांच्या तोंडुन शब्द बाहेर पडले. छबुराव सोनवणे, बापुराव जाधव, अरुण जगताप, संतोष साबळे, गणेश मुंडे, सुरेश खाडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आधिकारी वडवणी पोलीस ठाण्याला लाभले. 

वडवणीकर आजही त्या अधिका-यांची आठवण आदराने काढतात.ठाण्यात आलेल्या प्रतिष्ठितांना चांगली वागणुक तर आरोपींना पोलीसी खाक्या दाखवत एकप्रकारे समतोल राखला.त्याउलठ सहाय्यक पोलीस निरिक्षक महेशकुमार टाक यांनी वडवणीकरांना वागणुक दिली. खडकी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण व त्यानंतर अल्पवयीन विवाह व गुन्हा असेल पिंपळा येथील अल्पवयीन विवाहीतेचा पित्याने केलेला खुन असेल किंवा जुगारावर मारलेली धाड असेल असे कित्येक प्रकरणं आर्थिक तडजोडीशिवाय दाखल झाले नाहीत. गुन्हेगारांना न्याय आणि सामान्यांवर अन्याय असे एकंदरीत गेल्या सहा महिन्यात पहायला मिळाले. वडवणी पोलीस ठाण्यातुन आता महेशकुमार टाक यांची बदली झाली आहे. त्यामुळे ठाण्याला लागलेली किड जाईल मात्र नव्याने रूजु होणा-या पोलीस अधिका-यांवर लागलेली किड साफ करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांनी ते लिलया पेलावे वडवणीकर त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत.कारण वडवणी तालुक्याला संघर्षाचा फार मोठा इतिहास आहे.आणि आजुनही वडवणीकरांच्या माथी लागलेला संघर्षाचा शिक्का आजही कायम आहे.ते विसरुन आजिबात चालणार नाही.

वडवणी तालुका पत्रकार संघ व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मागणीला यश


वडवणी तालुक्याचे असलेले पोलीस स्टेशन यामध्ये सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास तसेच बोकाळले अवैध धंदे आणि गुन्हेगार सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस ठाण्याचे एपीआय महेश कुमार यांची अखेर बदली झाली आहे. वडवणी तालुका पत्रकार संघाने तात्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे बदलीची मागणी केली होती. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादेक इनामदार यांनीही राज्याच्या गृह विभागाकडे बदलीची मागणी केली होती. त्यामुळेच महेश टाक यांची बदली झाली आहे.No comments