Breaking News

रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या केज तालुकाध्यक्षपदी बळीराम गायकवाड तर कार्याध्यक्षपदी रमेश निशिगंध

गौतम बचुटे । केज  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात सर यांनी केज तालुका अध्यक्षपदी बळीराम गायकवाड तर कार्याध्यक्षपदी रमेश निशिंगध यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी दिनांक १३ ऑक्टोबर रोजी केज येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत केज तालुका अध्यक्ष बळीराम गायकवाड आणि कार्याध्यक्ष म्हणून रमेश निशिगंध यांची निवड करून नियुक्तीपत्र दिले. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे केज शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड, रमेश निशिगंध, बळीराम गायकवाड, चंद्रशेखर ओव्हाळ, अमोल मस्के, दिलीप कसबे, गणेश मस्के, सचिन शिनगारे, राजू तुपारे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. निवडी नंतर नूतन तालुकाध्यक्ष बळीराम गायकवाड आणि कार्याध्यक्ष रमेश निशिगंध यांनी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व चंद्रकांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर तालुक्यात रिपब्लिकन श्रमिक सेनेचे कार्य वाढवून त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची व माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विचार रुजवून तळागाळात आणि दलित व कामगारवर्गात परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.

दरम्यान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात हे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रणित रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाभर जाळे तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या बद्दल संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी देखील चंद्रकांत खरात यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.No comments