Breaking News

जयभवानी सह. साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

 नोंदणी केलेल्या सर्व ऊसाचे गाळप करणार - चेअरमन अमरसिंह पंडित

गढी : जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे शुभहस्ते व चेअरमन अमरसिंह पंडित यांचे अध्यक्षेतेखाली गव्हाणीमध्ये मोळी टाकून संपन्न झाला. कारखाना कार्यक्षेत्रातील नोंदणी केलेल्या सर्व ऊसाचे जय भवानी गाळप करणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आवाहन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. प्रसंगी बोलतांना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, पुढील गळीत हंगामसाठी कारखान्याची गाळप क्षमता १००० मे. टनाने वाढविणार आहोत. या हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदविलेला सर्व ऊस गाळपास आणणार असल्याने  कारखाना मे २०२१ पर्यन्त चालण्याची शक्यता आहे, पुढील वर्षाचा गाळप हंगाम साठी कारखाना कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले झाल्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल असून त्यासाठी कारखान्याने शेतकर्‍यांना सुधारित जातीचा को- ८६०३२ ऊस लागवड करण्याचे आवाहन केले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२० मध्ये होणार्‍या सुधारीत जातीच्या ऊस लागवडीस पुढील गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गळीतास घेण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कारखान्यातील अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांचे या कोरोना च्या पार्श्वभूमीवर कारखान्यात काम करण्याच्या जिद्धीला व चिकाटी बद्दल त्यांनी कौतुक केले. शेवटी त्यांनी सर्वांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी ह.भ.प. महादेव महाराज यांनी कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जयभवानी कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर, भास्करराव खरात, सुनील पाटील, श्रीराम आरगडे, संदीपान दातखिळ, आप्पासाहेब गव्हाणे, शेख मन्सुर, राजेंद्र वारंगे, जगन्नाथ दिवाण, भवानी बँक अध्यक्ष बाप्पासाहेब मोटे, सभापती जगन पाटील काळे, कुमारराव ढाकणे, भारत पंडित, पृथ्वीराजे पंडित, विश्वंबरबप्पा काकडे,  कार्यकारी संचालक के. एल. क्षीरसागर, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांचेसह तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, ऊस बागायतदार, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी, कामगार, शेतकरी, ऊस तोडणी बागातदार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकृष्ण ठोसर यांनी केले व आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी केले.


No comments