Breaking News

मुलींनो स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा--पुजा रेखावार

 बाळासाहेब आडागळे । माजलगाव   आज 21 व्या शतकात तंत्रज्ञानासोबत वेगवान वाटचाल करताना विद्यार्थिनींनी आता आत्मविश्वासाने शिक्षण घेत स्वप्न साकार करण्याची गरज आहे कारण त्यातूनच बलशाली भारताची निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन सौ.पुजा राहुल रेखावार यांनी केले.

त्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष व शारदोत्सव निमित्त आयोजित विद्यार्थिनींना उपयुक्त साहित्य वाटप समारंभ  प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर भाशिप्र संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, प्रमुख अतिथी प्रा. मनीषा टोपरे, वैष्णवी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी 11 वी  च्या विद्यार्थिनीसाठी 'दिवस तुझे हे फुलायचे' या विषयावर अभिवाचन करून प्रा. टोपरे आणि कु.कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन मुलींनी कसे सावधानतेने जगावे हे सांगितले.

     

अध्यक्षीय समारोपात भा.शि. प्र.संस्थेचे कार्यवाह  नितीन शेटे यांनी स्त्रियांचे सबलीकरण हा भारताच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असल्याचे सांगत मुलींनी आता स्वयंसिद्ध होत स्वाभिमानाने जागून स्वप्न साकार करावेत असे म्हटले. स्थानिक कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनीही या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींनी अधिकाधिक सजग होऊन प्रेरणा घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ भालचंद्र कराड आणि सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मीकांत सोन्नर यांनी केले.वैयक्तिक पद्य प्रा.अंकुश साबळे यांनी सादर केले.मान्यवरांचे आभार प्रा. राघवेंद्र मुळी यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे,अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने,जगदीश साखरे, केंद्रीय सदस्य मुख्याध्यापक बाबुराव आडे,अंबादास रोकडे, उपप्राचार्य प्रा. संतोश लिंबकर, डॉ.गजानन होन्ना,पेय.युवराज मुळ्ये यांच्यासह प्राध्यापक ,विद्यार्थिनी यांची कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन  करून उपस्थिती होती.


No comments