Breaking News

आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहिदांच्या मुलींसाठी आईसाहेब मंगल कार्यालय पूर्णतः मोफत - महंत राधाताई महाराजपाटोदा : संत मीराबाई संस्थान, महासांगवीच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांनी संस्थानचे प्रशस्त मंगल कार्यालय परिसरातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या व शहिद सैनिकांच्या मुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

सैनिक आणि शेतकरी हे खऱ्या अर्थाने देशाचे आधारस्तंभ आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे सैनिक आपले खरे हिरो आहेत. त्यांच्या पश्चात आपण त्यांच्या कुटुंबाला आधार आणि सन्मान देणं गरजेचं आहे याच भावनेतून त्यांना आपण संत मीराबाई संस्थानचे आईसाहेब मंगल कार्यालय हे पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटोदा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महासांगवी गावात संस्थाचे भव्य मंगल कार्यालय आहे. जिथे पाणी, लाईट, पार्किंगची उत्तम व्यवस्था असून हजारो लोकं बसू शकतील अशी दर्जेदार आसन व्यवस्था आहे. पूर्ण दहा एक्कर च्या जागेत हा परिसर आहे. अत्यंत खेळती हवा, झाडं, झुडपं, सावली आणि सर्व सोयी सुविधा युक्त  हे मंगल कार्यालय आहे.

शिवाय परिसरातील जे शेतकरी, शेतमजूर, कामगार आर्थिक दृष्ट्या अडचणीत असतील त्यांना ही माफक दरात हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती संस्थानच्या महंत मठाधिपती राधताई महाराज यांनी दिली आहे.


No comments