Breaking News

बर्दापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी आरोपीस अटक करा; परळी तहसीलदारांना निवेदन

 परळी  : बर्दापूर, ता.अंबाजोगाई, जि. बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर दगडफेक करून विटंबना करण्यात आली. या मध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे. अन्यथा फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दि.२८/१०/२०२० रोजी परळी तहसील कार्यालयातील अधिकारी रुपणर साहेबांना देण्यात आले.

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची भूमी असून येथे अशा घटना वारंवार होणे निंदनीय आहे. अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांवरील वाढते अत्याचार व वारंवार होणारी महापुरुषांची विटंबना यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलून अशा घटना घडवून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकास शासनानी कठोर शिक्षा करावी. हे निवेदन देताना प्रा.डॉ.विनोद जगतकर, महादेव ताटे, अनंत इंगळे, माजी उपनगर अध्यक्ष अयुब पठाण, नगरसेवक केशव गायकवाड, इंजि.भगवान साकसमुद्रे, रवी मुळे, किशन गायकवाड, धम्मा अवचारे, अमर रोडे, राज जगतकर, अमर तरकसे, अमर सूर्यवंशी, निलेश वाव्हळे, ज्ञानोबा मस्के, साहिल रोडे, अजय सरवदे, सिद्धार्थ गवळी, गिरीश भोसले, आदींची उपस्थिती होती.No comments