Breaking News

माजलगाव मतदारसंघातील विकास कामाबाबत खा. शरद पवारांना आमदार सोळंके यांनी दिलं निवेदन


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

 मतदारसंघातील विकास कामे व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्वादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट घेत विकासकामा संदर्भात आज दि. 20 मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली.


माजलगाव शहरपासुन अवघ्या काही अंतरावर कल्याण ते विशाखापट्टणम या राष्ट्ीय महामार्गावर माजलगाव धरणालगत एमआयडीसीचे काम पुर्ण झालेले आहे. औरंगाबादच्या एमआयडीसीपेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने माजलगावची एमआयडीसी मोठी आहे. या एमआयडीसीमध्ये सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. विज, रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. आता फक्त उद्योग येण्याची गरज आहे.

 

ही एमआयडीसी सुरू झाल्यास मतदारसंघातील हजारो सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे तर माजलगाव मतदारसंघाचा देखिल मोठा विकास होणार आहे. याचबरोबर परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे. खरिप हंगामातील सोयाबीन, कापुस, तुर, बाजरी या पिकांचे आतोनात नुकसान झाले तर पपई, मोसंबी, सिताफळ बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असुन आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे तात्काळ शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज आहे. जेणेकरून या संकटातुन सावरण्यासाठी शेतक-यास मदत होणार आहे. मतदारसंघातील विकास कामासंदर्भात देखिल चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक यांची उपस्थिती होती.No comments