Breaking News

नगरपंचायत हद्दीतील जागेवर अतिक्रमण केल्याने नगरसेवक अपात्र!

 

जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश , मुख्याधिकाऱ्यांना अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देशशिरूर कासार : नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे शिरूर कासार येथील नगरपंचायतीचे एका नगरसेवकला अपात्र घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे  आदेश जिल्हाधिकारी  यांनी नुकतेच दिले असून तसेच आदेशाची पालन करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे शुक्रवारी (दि.१६) दिल्या आहेत. 

शिरूर कासार नगर पंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेले नगरसेवक ज्ञानेश्वर ऊटे हे डिसेंबर २०१५ ते २०१७ या कालावधीत नगर पंचायतीचे ते, बांधकाम सभापती होते. त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून नगर भूमापन क्रमांक ४६  क्षेत्र २७६९ मौजे शिरूर येथील शासकीय जमिनीवर रस्त्यालगत एक दुकान गाळ्याचे १२  बाय १५ पक्के बांधकाम केल्याबाबत तसेच सर्व्हे क्रमांक २९३ व सर्व्हे क्रमांक २१४ या दोन्ही मधील मुख्य रस्त्यालगत जागेवर अतिक्रमण केलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार होऊन नगर पंचायतीचे नगर सेवक ज्ञानेश्वर ऊटे यांचे नगरसेवक पद अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार रावसाहेब ढाकणे यांनी दि. १६ एप्रिल २०१८ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. 

दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी होवून दि. १३ जुलै २०१८ ला नगरसेवक ज्ञानेश्वर ऊटे यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र नगरसेवक ज्ञानेश्वर ऊटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशा विरुद्ध नगर विकास राज्यमंत्री यांच्याकडे दि. २७ जुलै २०१८ अपील केली होती. त्यानुसार नगर विकास राज्यमंत्री यांनी दि. २ जानेवारी २०१९ रोजी अंतिम सुनावणी नंतर आदेश पारीत करून जिल्हाधिकारी यांच्याकडील दि. १३ जुलै २०१८ रोजीचे आदेश रद्द करून अपिलार्थी ज्ञानेश्वर ऊटे यांची बाजू सविस्तर ऐकून घेऊन व त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासून फेर आदेश पारीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 

 दि. ३० मार्च २०१९ रोजी या प्रकरणावर जिल्हा दंडाशिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी दरम्यान  तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्यानंतरही या प्रकरणात नगरसेवक ज्ञानेश्वर ऊटे दोषी आढळून आल्याने त्यांना नगर पंचायत सदस्य म्हणून काम करण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकारी नगरपंचायत शिरूर कासार यांनी  याबाबत राज्य निवडणूक आयोग यांना कळवावे असेही आदेश देण्यात आले आहेत.  No comments