Breaking News

शेतकऱ्यांनी मुग, सोयाबीन, उडीदची ऑनलाईन नोंदणी गेवराई खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात करावी- संग्राम आहेर


गेवराई : शासकीय हमी भावाने मुग, सोयाबीन आणि उडीद या अन्नधान्याची ऑनलाईन नोंदणी गेवराई तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात सुरू करण्यात आली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात  ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


प्रसिद्धीपत्रकात माहिती देताना ते पुढे म्हणाले की या वर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्याच्या अन्नधान्य खरेदी-विक्रीची परवानगी शासनाने गेवराई तालुका खरेदी-विक्री संघाकडे दिली असून  खरेदी-विक्री संघामध्ये शासकीय आधारभूत किंमत खरेदीच्या माध्यमातून मुग, सोयाबीन व उडीद या पिकांची ऑनलाईन नोंदणी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात सुरु केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी या ऑनलाईन नोंदणीसाठी ऑनलाईन पिक पेरा असलेला सातबारा उतारा, पीक पेरा प्रमाणपत्र, 8 अ चा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रति सह आपल्या पिकाची नोंदणी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात  संघातील रघुनाथ काटकर यांच्याकडे सकाळी साडे दहा ते साडेपाच या वेळेत करावी असेही खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, उपाध्यक्ष फुलचंद बोरकर यांच्यासह संघाच्या सर्व संचालकांनी केले आहे.

No comments