Breaking News

रेशीम कार्यालयातील लाचखोर 'किडा" अडकला लाचलुचपत विभागाच्या पोलीसांच्या 'कोषात" !गौतम बचुटे । केज   

जिल्हा रेशीम कार्यालयातील क्षेत्रीय सहाय्यकाने रेशीम पालनासाठी तुतीच्या लागवडी करीता एका शेतकऱ्या कडून केज बस स्टँडवर पाच हजार रुपयांची लाच स्विकाताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.

 या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील तांबवा येथील शेतकरी बळीराम भगवान चाटे यांनी त्यांच्या शेतात रेशीम पालनासाठी तुतीची लागवड करावयाची होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा प्रस्ताव बीड जिल्हा रेशीम कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु पृथ्वीच्या लागवडीसाठीची परवानगी व अनुदान मिळण्यासाठी रेशीम कार्यालयातील क्षेत्रीय सहाय्यक सुबराव गुलाबराव मस्के यांनी त्यांना १५ हजार रुपयाची लाच मागितली. यासाठी बळीराम चाटे यांनी त्यांना १३ हजार रुपये  देण्याचे त्यांनी कबूल केले; परंतु बळीराम चाटे यांनी या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली.

 त्या नुसार दि.११ ऑक्टोबर रोजी ५:३० वा दरम्यान त्यांना केज येथील बस स्टँड परिसरात तक्रारदार बळीराम चाटे यांचेकडून ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र परदेशी यांच्या  फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला लोकसेवक सुबराव गुलाबराव मस्के यांच्या विरोधात गु.र.नं. ४३३/२०२० लाचलूचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८८ सुधारणा ( २०१८ ) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1 comment: