Breaking News

कै. गोविंदराव यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त शाळेला दिले पुस्तक भेटशाळेला दिडशे पुस्तक देऊन राबविला स्तुत्य उपक्रम

जगदीश गोरे । धारूर

धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील धार्मिक क्षेत्राची व पुस्तक वाचण्याची आवड आसलेले कै.गोविंदराव माधव यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नातु दत्ता यादव यांनी धुनकवाड येथील जिल्हा परिषद शाळेला दिडशे पुस्तक भेट दिले.

 

कै.गोविंदराव यादव हे धार्मिक क्षेत्राची आवड असल्याने ग्रंथ,भजन,व पुस्तके वाचण्याची खुप आवड होती तरी त्यांचे निधन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याने प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इतर खर्चाला फाटा देत त्यांचा नातु दत्ता बंडू यादव यांनी आपल्याच गावातील विद्यार्थ्यांना व तरूणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व "वाचेल तो टिकेल" या उक्तीप्रमाणे गावातील तरुण पिढीला वाचनाची गोडी निर्माण होईल व यातुन तरुणांना प्रेरणा मिळेल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला व इतर खर्चाला फाटा देत गावातील

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धूनकवाड या शाळेला दिडशे महापुरुषांचे व वेगवेगळे पुस्तके भेट दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ससाणे, शिक्षक बी. एस. कुलकरणी, गुरव, यसुगडे, नाईकवाडे, बनकर, विष्णु महाराज यादव, बंकटी गोरे,आत्माराम यादव,  छत्रभुज कागणे, विक्राम यादव, जगन्नाथ यादव,  श्रीमंत यादव,आर्मी सौनिक राम यादव, युवा व्याख्याते सुर्यनारायण यादव, भागवत यादव, दत्ता यादव व त्यांची मुले रामप्रसाद यादव, शिवाजी यादव,बंडु यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.No comments