Breaking News

केज पोलिसांची अवैद्य दारूविक्री विरुद्ध कार्यवाही : हॉटेल्स आणि धाब्यावर धाड

गौतम बचुटे । केज 

प्रतिकात्मक


केस पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात जोरदार कार्यवाही करीत बेकायदेशीररित्या दारूविक्री होत असलेले हॉटेल्स, धाबे आणि हातभट्टयावर छापे टाकून मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले.

केज पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि त्यांचे सहकारी अशोक नामदास, राजू गुंजाळ, वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी टाकळी फाटा येथील हॉटेल समर्थ, डोणगाव फाट्यावरील हॉटेल साई, कोरेगाव शिवारातील जयहिंद हॉटेल आणि मसाजोग येथील हॉटेल विसावा या चार ठिकाणी अवैद्यरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत मिळताच अचानक धाड टाकली. धाडीत देशी दारू व टँगो पंच नावाच्या ४७ बॉटल्स जप्त केल्या याची किंमत १२७४ रुपये आहे. या प्रकरणी सतीश घुले  सुग्रीव घुले  सलमान शेख आणि बापू तुपारे यांना ताब्यात घेतले आहे. 

तसेच दुसऱ्या पथकाचे सहाय्यक फौजदार महादेव गुजर यांच्यासह त्यांचे सहकारी मंगेश भोले, अशोक नामदास, दिनकर पुरी, रुक्मिणी पाचपिंडे व धनपाल लोखंडे यांनी पिसेगाव शिवारात आणि क्रांतीनगर येथे हे हातभट्टीवर टाकून ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांनी अचानक दारूविक्री विरोधात उचललेल्या कठोर पावसामुळे अवैध दारू विक्री आणि अवैद्य धंदे करणारे यांच्यात खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. 


No comments