Breaking News

आ.संदीप क्षीरसागर यांनी रुग्णालयाच्या अधिकार्‍यांची घेतली बैठक


तोडफोड प्रकरणाचा घेतला आढावा : कुठलीही भीती न बाळगता कर्मचार्‍यांनी काम करावे

बीड :  जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या एका ६५ वर्षीय इसमाचा रात्री मृत्यू झाल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वार्डातील तोडफोड केली होती. काल सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांनी रुग्णालयात जावून अधिकार्‍यांची बैठक घेतली व त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्स आदींची उपस्थिती होती. 
   

जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय इसमाचा रात्री मृत्यू झाला. यामुळे मयताच्या नातेवाईकांनी वार्डमध्ये गोंधळ घालत तोडफोड केली होती. या घटनेने आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली होती. आज सकाळी आ. संदीप क्षीरसागर यांनी रुग्णालयात जावून रुग्णालयाच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी रुग्णालय प्रशासनाला योग्य निर्देश देण्यात आले. कुठलीही भीती न बाळगता डॉक्टरांनी काम करण्याचे क्षीरसागरांनी सूचीत केले. या वेळी त्यांनी ऑक्सीजन प्लान्टचीही पाहणी केली. या वेळी डॉ. अशोक थोरात, शहरातील नगरसेवक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सिस्टर, वार्डबॉय आदीची उपस्थिती होती. No comments