Breaking News

पंकजाताई मुंडे यांच्यावरील गुन्हा राजकीय द्वेषापोटी - निळकंठ चाटे


गुन्हा मागे न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा भाजयुमोचा इशारा - उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

परळी :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यावर राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल करण्यात आला असून हा  गुन्हा तात्काळ मागे न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे. भाजयुमोच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली  उप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदनाद्वारे हा इशारा दिला.

   यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांनी सावरगावघाट, ता. पाटोदा, जि.बीड येथे ऑनलाईन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. हा दसरा मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेतला गेला आहे. तरी सुध्दा राजकीय व्देषातून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा मुंबईत दसरा मेळावा झाला, भगवानगडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकर यांचा मेळावा झाला, येडेश्वरी कारखाना केज येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला सदरील सर्व कार्यक्रमात कसलेही सोशल डिस्टन्स पाळले गेले नव्हते. हे प्रशासनाला दिसले नाही का? मग त्यांच्या कार्यक्रमांवर का गुन्हे दाखल झाले नाहीत? असे असतांना लोकनेत्या  पंकजाताई मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे कारण काय ? असा आमचा सवाल आहे असे चाटे म्हणाले.

 राजकीय व्देषातून दाखल केलेले सदरील गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री उत्तमदादा माने, शालिनीताई कराड, भीमराव दादा मुंडे, पवन मुंडे सर, नरेश पिंपळे, संतोष सोळंके, राजेंद्रजी ओझा, नरसिंग सिरसाठ, बाबा शिंदे, मोहन जोशी, अनिष अग्रवाल, सचिन गित्ते, शिवराज मुंडे, ॲड. अरुण पाठक, योगेश पांडकर, सुशील हरंगुळे, वैजनाथ रेकने, दिलीप नेहरकर, राजेश आघाव ,विजय दहिवाळ, श्रीपाद शिंदे, गोपी कांगने ,गोविंद चौरे ,शमी शेख, विकास मुंडे, सुरेश सातभाई, अवधूत नागरगोजे, जितेंद्र मस्के, गोविंद बोबडे, मुरली पारवे, दिपक गित्ते, शाम गित्ते, नितीन मुंडे ,दिपक नागरगोजे, विशाल कराड, ज्ञानेश्वर मुंडे, नारायण गुट्टे, चैतन्य मुंडे, वैभव फड आदी उपस्थित होते.


No comments