Breaking News

परळीतील सुज्ञ पालक, शिक्षण प्रेमी नागरिक मात्र अकॅडमीला बदनाम करण्याचा डाव हाणून पाडतील- अश्विन मोगरकरपरळी वैजनाथ : जवाहर एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी वर आरोप करून खोटे गुन्हे दाखल करणार्यांनी परळी शहरात सुरू झालेली दर्जेदार शैक्षणिक परंपरा मोडीत काढण्याचा कुटील डाव मांडला असल्याचा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे.

परळी वैजनाथ व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई पुणे लातूर च्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटी मार्फत लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी चालवली जाते. लातूर सारख्या शहरात राजर्षी शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज व इतर नामवंत संस्थेमार्फत NEET/IIT-JEE च्या अभ्यासक्रमासाठी अकॅडमी चालवली जातात. त्याच धर्तीवर 2 वर्षांपूर्वी लोकनेत्या मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून जवाहर एज्युकेशन सोसायटी मार्फत लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी चालू केली. या अकॅडमीत कोटा, हैद्राबाद येथील तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी लातूर पुणे मुंबई पेक्षाही कमी पैशात परळीत NEET/IIT-JEE चे क्लासेस चालू झाले. अकॅडमी मार्फत टॅलेंट हंट, करियर गायडन्स सेमिनार आयोजित करून विद्यार्थां मार्गदर्शन केलं जाते. चालू वर्षात अकॅडमीचे तब्बल 15 विद्यार्थी मेडिकल ला प्रवेश घेत आहेत. विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या अत्यल्प फिस वरच अकॅडमी चालते व पालक आपल्या पाल्यांना मिळणाऱ्या शिक्षणावर समाधानी आहेत.

जवाहर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय इटके गुरुजी कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी ला बदनाम करण्यासाठी व शहरात चालू केलेली दर्जेदार शिक्षण चळवळ बंद पाडण्याचा डाव आहे. परळीतील सुज्ञ पालक, शिक्षण प्रेमी नागरिक मात्र अकॅडमीला बदनाम करण्याचा डाव हाणून पाडतील असा विश्वास अश्विन मोगरकर यांनी व्यक्त केला.


No comments