Breaking News

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात निधी कमी पडू देणार नाही-आ.संदिप क्षीरसागरपेठ बीडमध्ये अद्यावत क्रीडा संकुल, बॅटमिंटन हॉल, जीम इमारत उभारली जाणार
बीड : शहरी व ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून येथील खेळाडूंना मैदान व सुविधा उपलब्द करून देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी तालुका क्रीडा समितीच्या बैठकीत बोलतांना तालुका क्रीडा समितीच्या सदस्यांना दिली आहे. पेठ बीड भागातील खंडेश्वरी मंदिरासमोर अद्यावत तालुका क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, जीम इमारत उभारली जाणार असून याची पाहणीही त्यांनी केली. 

तालुका क्रीडा संकुल समिती बीडची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आ.संदिप क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीला समितीचे कार्याध्यक्ष तथा तहसीलदार शिंदे सुशांत, तालुका क्रीडा अधिकारी तथा सचिव अरविंद विद्यागर, उपअभियंता शिंदे, मोमीन, पोली निरीक्षक विश्वास पाटील, गटशिक्षण अधिकारी तुकाराम जाधव, क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांच्यासह सदस्य उपस्थित होेते. यावेळी बैठकीत बोलतांना आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड तालुका क्रीडा संकुल समितीला विविध योजनांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत समितीने प्रस्तावीत केलेल्या पेठ बीड भागातील अद्यावत क्रीडा संकुल, बॅटमिंटन हॉल, जीम इमारत याचे चांगल्या दर्जाचे काम करून घेवून बीड शहराच्या वैभवात भर पाडून घेवू. या कामांमुळे पेठ बीड भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील असे सांगत क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी दिली. 

या बैठकीनंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील तालुका क्रीडा संकुल व नव्याने बांधण्यात येणार्‍या बॅटमिंटन हॉल, जीम व इतर कामाच्या जागेची पाहणी केली. ही पाहणी करत असतांना यापुर्वी करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व व्यवस्थित नसल्याने ते व्यवस्थित करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. काम निकृष्ट दर्जाचे, पुन्हा करण्याच्या सूचना
खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात तालुका क्रीडा संकुलाचे लेवलींगचे करण्याचे काम अतिशय थातूर-मातूर केलेले आहे. लेवलींग व्यवस्थित नाही, अंदाजपत्रकातील सुविधा नाहीत याबाबत समितीच्या सदस्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सदर काम पुन्हा दुरूस्त करून घेत या तालुका क्रीडा संकुलच्या जागेला संरक्षण भिंत करण्यात येणार असल्याचेही आ.संदिप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. No comments