Breaking News

विलास ओव्हाळ यांच्यावरील हल्ला प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही संदर्भात गृहमंत्र्याना भेटणार -चंद्रकांत खरात

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी विलास ओव्हाळ यांची भेट

गौतम बचुटे । केज : केज तालुक्यातील जानेगाव येथील सरपंच पती विलास ओव्हाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या प्रकरणी कर्तव्यात कसूर करून गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्या संदर्भात राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांची भेट घेणार असल्याची माहिती चंद्रकांत खरात यांनी दिली.

दि २ ऑक्टोबर रोजी केज तालुक्यातील जानेगाव येथील सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांचे पती विलास ओव्हाळ  यांच्यावर जातीयवादी गावगुंडांनी खुनी हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपीनाच मदत केली. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी केला. या संदर्भात आरोपीना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत; म्हणून चंद्रकांत खरात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा श्रमिक सेनेचे संस्थापक महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांना भेटणार आहेत. दरम्यान दि.६ ऑक्टोबर रोजी चंद्रकांत खरात यांनी जखमी विलास ओव्हाळ यांची स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात येथे भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली आणि कार्यवाही व हल्ल्या संदर्भात माहिती घेतली.No comments