Breaking News

पवार साहेबांनी महेबूब शेख यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी - अतुल शिंदेके. के. निकाळजे । आष्टी 

              बीड जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांना राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार साहेबांनी विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी आ.जितेंद्र आव्हाड युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी केली आहे.

               

महेबूब शेख यांनी राजकारणाची सुरवात शिरूर कासार शहराचे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष पदापासून सुरू केली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महेबूब शेख यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून आजतागायत पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. पक्ष सत्तेत असताना आणि नसताना देखील शेख यांनी उत्कृष्ट वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर पक्षात युवकांची फौज उभी करण्याचे काम सतत चालू ठेवले आहे. महेबूब भाई यांनी तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शेख यांच्या कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन खा. शरद पवार यांनी महेबूब भाईंना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पद बहाल केले.

               तत्कालीन भाजप सरकारने चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात लावलेल्या जाचक अटींच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊन मेहबूब भाई यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. तसेच पद स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर युवकांच्या बेरोजगारी प्रश्न उपस्थित करून गाजर नको रोजगार हवा हे लक्षणीय आंदोलन केले होते. याचप्रकारे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि युवकांच्या वाढत्या बेरोजगारी करीता प्रतिकात्मक गळफास, रास्ता रोको, भजे तलो आंदोलन शेख यांनी केले आहेत. नाशिक येथील रेल्वे रोको आंदोलनात शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार करून गुन्हे दाखल केले होते. 

          

पुरग्रस्ता सोबत आपली दिवाळी साजरी करणारे, भाजप सरकार व तत्कालीन मुख्यमंत्र्यावर बेधडक टीका करणारे, पक्षातील प्रत्येक नेत्यांचा विश्वास जिकुंन त्यांना अपलेसे करणारे, प्रत्येकाशी अपुलकिचा संवाद साधणारे, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवणारे तसेच समाजकार्यासाठी सदैव तत्पर असणारे महाराष्ट्रातील तमाम युवकांचे अष्टपैलू नेतृत्व महेबूब भाई शेख यांना शरद पवार साहेबांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी केली आहे.


No comments