Breaking News

पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये यांची परळीच्या ठाण्याला भेट

परळी : अंबेजोगाई विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी(DySP) सुनिल जायभाये यांची परळी येथे दि.७ ऑक्टोबर २०२० रोजी पदभार स्वीकारल्यांनंतर प्रथमच भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी परळी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.

  या आढावा भेटीत परळी शहर, संभाजी नगर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली. संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये(DySP) यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव मॅडम, संभाजी नगर पोलीस स्टेशनचे चांद मेंडके, पोलीस उपनिरीक्षक नारायण गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, समाधान भाजीभाकरे, रुपेश शिंदे, मस्के, भागवत आदी उपस्थित होते.


No comments