Breaking News

आमदार सुरेश धस यांच्या मुळे शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज-स्वियसहाय्यक आप्पासाहेब येवले


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार तालुक्यातील शेतकऱ्यांना कळविण्यात येते की,ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, शिरूर(कासार) या ठिकाणी पीक कर्जासाठी अर्ज केलेला आहे. त्यातील सुरुवातीच्या 150 शेतकऱ्यांची यादी बँकेने लावलेली आहे. या यादीमध्ये बँकेने तारखेनुसार शेतकऱ्यांची यादी बनवलेली आहे.


तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की,आपले नाव ज्या तारखीला आलेले आहे. त्याच शेतकऱ्यांनी त्या दिवशी बँकेत जायचे आहे, आणि आपले पुढील कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून पीक कर्जाचा लाभ घ्यावा असे आमदार सुरेश धस यांचे स्विय सहायक आप्पासाहेब येवली यांनी सांगितले आहे.

अडचण आल्यास संपर्क साधा!


आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी बँकेमध्ये जाऊन कागदोपत्री व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करून पीक कर्जाचा लाभ घ्यावा तसेच बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास खालील क्रमांकावरती संपर्क साधावा.

-आप्पासाहेब येवले 

जनसेवक तथा स्वीय सहाय्यक, आ.सुरेश धस. मो. 8308774747

शेतकऱ्यांनी पीक कर्जाची कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी!


शिरूर तालुक्यातील आत्तापर्यंत सुमारे 650 ते 700 शेतकऱ्यांनी पीक कर्ज संदर्भात नोंदणी केलेल्या आहेत अजून देखील काही शेतकरी नोंदणी करीत असून डिसेंबर पर्यंत चार ते पाच टप्प्यांमध्ये त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

-सचिन दसपुते, मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक शिरूर कासार.

No comments