Breaking News

उपविभागीय अधिकारी यांचा अवैध मुरूम उपसा करणाऱ्याला दणकाजेसीबी सोबत एक हायवा व छोटा हत्ती जप्त
बाळासाहेब आडागळे । माजलगाव

माजलगाव तालुक्यात सतत अवैधरित्या शासनाची हजारो रुपयाचा महसूल चुकवून नदीपात्रातील वाळू, मुरूम उपसा करणाऱ्यावर उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी  कार्यवाही करून एक जेसीबी सोबत हायवा व छोटा हत्ती जप्त केला आहे.

माजलगाव तालुक्यात काही दिवसाने माजलगाव तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या मुरूम व वाळू उपसा चालू असून या अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी आता उपविभागीय अधिकाऱ्याने पुढाकार घेतला असून आज तालुक्यातील माजलगाव, आडगाव, सावरगाव या गावात छापे मारून मुरूम उपसा करणाऱ्या जेसीबी सोबत हायवा व छोटा हात्ती जप्त केली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, मंडळ अधिकारी पदमाकर मुळाटे, मंडळ अधिकारी विकास टाकनखार, तलाठी सोपान वागमारे, शुभास गोरे व तलाठी परवीन शिंदे हे उपस्थित होते.


No comments