Breaking News

ऊसतोड कामगारांचा संप चिघळला, छत्रपती कारखान्यावर सीटूचे मोहन जाधव यांचे आंदोलन


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

सध्या राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा संप न्याय मागण्या घेऊन सुरू आहे. संपातील मागण्या ऊसतोड कामगारांचा तोडणी दर चारशे रुपये करा, मुकादमाचे कमिशन, वाहतुकीच्या दरात वाढ, पाच वर्षाचा करार तीन वर्षाचा करावा, विमा मिळाला पाहिजे, ऊसतोड कामगारांचे महामंडळ कार्यान्वित झाले पाहिजे. यासह अनेक मागण्या संपात करण्यात आलेल्या आहेत.

संपावर तोडगा काढा नसता कारखान्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीटू ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव येथे आज जोरदार आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्या शिवाय कारखाने सुरू करू नये, आता संप शेवटच्या टप्प्यात आला असून साखर संघाच्या चार बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही, परंतु 27 तारखेला पुणे येथे साखर संघाने मा शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघ, शासन व सीटू ऊसतोड कामगार संघटने सह कामगारांच्या सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे, या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहे. 


सत्तावीस तारखेला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर योग्य तोडगा नाही निघाला तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असाही इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने मोहन जाधव, विनायक चव्हाण, आबा राठोड, विजय राठोड, संजय चव्हाण, बळीराम भुंबे, रुपेश चव्हाण, भिमराव जाधव, भारत राठोड, अविनाश राठोड, मेंडके यांनी दिला आहे.

No comments