Breaking News

केज-कळंब रोडवर छोटा हत्ती आगीत भस्मात

 


गौतम बचुटे । केज  

केज- कळंब रोडवरील चिंचोली पाटी जवळ दि २५ ऑक्टोबर रोजी रात्री १:०० च्या दरम्यान एक छोटा हत्ती वाहन जळून खाक झाले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज कडून कळंबकडे जात असलेले छोटा हत्ती हे वाहन क्र. (एम एच-२२/ए ए-१३३४) हे केज ते साळेगाव दरम्यानच्या चिंचोली पाटी जवळ दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री १:०० वा. जळत होते. 

ही माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी घटना स्थळावर जाऊन पहाणी केली. दरम्यान सदर प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सदर वाहन हे गंगाधर उकांडे जि. परभणी यांच्या नावाने आरटीओ कार्यालय परभणी कार्यालयात नोंद आहे. या जळीत प्रकरणी घातपात असण्याची शक्यता असून या गाडीत जळते निखारे टाकून आग लावली असण्याचा संशय आहे. मात्र अद्याप पर्यंत या घटनेची तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही.
No comments