हाथरस घटनेची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या; 'कोरो' ची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
गौतम बचुटे । केज
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मीकी या दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार च हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करून न्याय मिळावा यासाठी कोरो या सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरो सामाजिक संस्थेचे अविनाश खरात यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित समाजातील अल्पवयीन मुलगी मनीषा वाल्मिकी हिच्यावर बलात्कार करून खून प्रकरणी त्या घटनेचा निषेध व्यक्त करीत त्याची तातडीने चौकशी करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीना कठोर शासन करावे.
तसेच अशा घटनांची पूनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे. अशा मागण्यांचे निवेदन केज तहसीलदारांना दिले आहे. निवेदनावर अविनाश खरात यांच्यासह औदुंबर गालफाडे, अनिता खंडागळे, लक्ष्मण हजारे, रामकवर खरात, योगेश चवरे व अभिजित चवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments