Breaking News

फेसबुकवर कॉमेंट करणे महागात पडले : निलेश राणे यांच्यासह तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगौतम बचुटे । केज  

वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध फेसबुकवर जातीय तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविणारे पोस्ट फेसबुकवर टाकल्या बद्दल केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे आणि केज तालुक्यातील दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याने सोशल मिडियावर नाहक बदनामी कारक पोस्ट टाकणाऱ्या फेसबुक्यात खळबळ माजली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे आणि केज तालुक्यातील दोघे विवेक अंबाड, रा. लाडेगाव आणि रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली होती. 

त्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, लाडेगाव ता. केज आणि विवेक चव्हाण पळसखेडा ता. केज यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४३२/२०२० भा.दं.वि. ५०५(२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान ऊठसूट सोशल मीडियावर काहीही पोस्ट करून समाजात अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचे पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध केज पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

तपासी पोलीस अधिकारी

No comments