Breaking News

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी करावी ―प्रा विजय मुंडेपरळी : तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परळी येथे आपली कापूस खरेदीची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केले आहे.

यावर्षी कापूस या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केल्यावर  भारतीय कपास  लि  व  राज्य पणन महासंघ द्वारे हमीभावाने शेतकऱ्यांचा  कापूस खरेदी केला जातो त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपली ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

   ऑनलाईन नोंदणीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे ऑनलाईन करावीत त्यामध्ये कापूस विक्री नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे   कागदपत्रे आहेत  त्यात (1)सातबारा (२)पिक पेरा (3)एक फोटो (4)आधार कार्डची झेरॉक्स व (5) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जमा करावीत व आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रा. विजय मुंडे यांनी केले आहे.


No comments