Breaking News

ज्यांच्या नावावर नाही, गुंठाभर जमीन तो पीएम-किसान योजनेचा लाभार्थी !


केज तालुक्यात हलगट गाभण राहिल्याचा प्रकार..!

पंचायत समिती पाठोपाठ आता पीएम किसान घोटाळा !

गौतम बचुटे ।  केज 

तालुक्यातील पंचायत समितीच्या १३ कोटी रु. घोटाळ्याची चर्चा आणि चौकशी सुरू असतानाच आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रचंड घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील अनेक गावात शेतकरी नाहीत अल्प भूमिहीन नाहीत अशा भूमिहीन यांची नावे संबंधित गावचे तलाठी पदार्थांची खाजगी लेखनिक मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार व सेतू केंद्र चालक यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून तसेच बनावट आणि बोगस लाभार्थ्यांचे नावे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या यादीत समाविष्ट केली आहे.  त्यामुळे संबंधित तलाठी त्यांचे खाजगी लेखनिक मंडळाधिकारी व नायब तहसीलदार यांनी शासकीय योजनेचा आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आपल्या कर्तव्यात कसूर करीत जाणीवपूर्वक शासकीय निधीचा गैरव्यवहार केलेला आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी माननीय विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळते. या घोटाळ्याची सखोल चौकशी झाल्यास अनेकजण अडचणीत येऊ शकतात. हा सर्व म्हणजे सरकारी योजना लाटण्यासाठी हलगट गाभण नव्हे तर हलगटाने दूध देण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे.

No comments