Breaking News

सुर्डीत दुषीत पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...ग्रामस्थांमध्ये संताप

 


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील सुर्डी-सोनेसांगवी येथे ग्रामपंचायतच्या वतीने केला जात असणारा पाणी पुरवठा हा दुषीत होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीने याकडं लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.  


तालुक्यातील सुर्डी-सोनेसांगवी येथे ग्रामपंचायतच्या द्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीरही बुडीत क्षेत्र असून तिच्याभोवती दलदल व अस्वच्छता निर्माण झाली असल्यामुळे हे पाणी दूषित झालेले आहे. यामुळे दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी पंकज भिसे यांनी केली आहे. तसेच गावात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या जलशुद्ध करण यंत्रणा आरओ प्लँट असून त्यातून प्रती जार दहा रुपये शुल्क आकारले जात असल्याची देखील तक्रारीत उल्लेख केलेला आहे.


हे पाणी सांडपाणी म्हणून वापरण्यासाठी असून ग्रामस्थांना पिण्यासाठी आरओ प्लँटचे पाणी उपलब्ध आहे. त्यासाठी प्रती जार पाच रुपये शुल्क ठेवले असल्याचे सोनेसांगवीचे ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे म्हणाले. No comments