Breaking News

अफगाणिस्तानशी सौहार्दाचे संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक - ना. भुजबळ


अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत 
झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

 मुंबई  : अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील  माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत झाकिया वर्दक यांनी नुकतीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय  येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. 


अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संगितले.


        श्री.  भुजबळ म्हणालेअफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिकसामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील  माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकासकामांबाबत राबविण्यात येणाऱ्या  उपक्रमाची माहिती  यावेळी श्री भुजबळ यांनी दिली .


   

No comments