Breaking News

ऊसतोड कामगारांचा दरवाढीचा करार लवादा मार्फत सिटूला अमान्य
कामगार संघटनांशी चर्चा करून नवीन त्रिपक्षीय करावा यासाठी सोमवारी जिल्हाभर प्रचंड निदर्शने,रास्ता रोको,धरणे आंदोलन

परळी : ऊसतोडणी कामगारांना दरवाढ देणारा करार ऊसतोड  कामगार संघटनांशी चर्चा करून  करावा, लवादा मार्फत नको या मागणीसाठी सिटू महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना सिटूच्या वतीने सोमवार दि.26 रोजी परळी तालुक्यात प्रचंड निदर्शने,रास्तारोको,धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते तथा  पंचायत समिती सदस्य कॉ सुदाम शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रका दुवारे दिली आहे.

दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हंटले आहे की,कामगारांचा वेतन करार राज्य सरकार, साखर संघ व कामगार संघटनाचे प्रतिनिधी यांच्या मध्ये होत असतो. तो करार असाच त्रिपक्षीय करावा लवादा मार्फत नको, अशी आग्रही मागणी सिटू प्रणित महाराष्ट्र उसतोड़नी व वाहतूक मुकादम कामगार संघटनेच्या वतीने साखर संघाचे चेअरमन यांना आम्ही केली  आहे. उसतोड़नी, वाहतूकदार, मुकादम कामगार यांच्या मजूरी वाढीचा वेतन त्रिपक्षीय सामंजस्य करार प्रलंबित आहे.या संदर्भात उसतोड़नी कामगार संघटनाच्या बरोबर साखर संघाने चारवेळा बैठका घेतल्या आहेत.

सहापैकी चार संघटनांनी साखर संघाने राज्य सरकारच्या प्रतिनिधि च्या उपस्थितीत उसतोड़नी कामगार मुकादम वाहतूकदार यांच्या  संघटनांबरोबर चर्चा करून मजूरीवाढीचा  सामंजस्य करार करावा,राज्य सहकारी साखर संघ नेहमी प्रमाणे उसतोड़णी कामगारावर लवादाचा   निर्णय लादण्याचा प्रयत्न करीत आहे. करीत असल्याच्या आरोप कॉ शिंदे यांनी केला आहे. वेतन कराराबाबत लवादाच्या मार्फत निर्णय करण्यास सिटू उसतोड़नी कामगार संघटनेसह बहुसंख्य कामगार संघटनांचा विरोध आहे.उसतोड़नी वाहतूक मुकादम कामगारांच्या  वेतन कराराबाबत निर्णय करण्यासाठी कुणाचाही लवाद नेमु नेय,तो आम्हाला मान्य नाही व लवादाने निर्णय घेतल्यास तो आमच्यावर बंधनकारक  राहणार नाही,उसतोड़नी कामगार  संघटनांच्या प्रतिनिधि व शासणाचे प्रतिनिधि,मा. सहकार मंत्री,साखर आयुक्त व कामगार आयुक्त,आदी यांचे उपस्थितीत चर्चा करून  उसतोड़नी वाहतूकीचे दरवाढ कमिशनवाढ इत्यादी  बाबत निर्णय तात्काळ करण्यात यावे.या इतर मागण्यासाठी सिटू महाराष्ट्र उसतोड़नी वाहतूक मुकादम कामगार संघटनेच्या सोमवारी होणाऱ्या आंदोलनात उसतोड़नी वाहतूक,मुकादम,कामगार यांनी प्रचंड संखेने सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष कॉ दत्ता डाके,अड.अजय बुरांडे,सय्यद रज्जाक, मोहन जाधव, सुदाम शिंदे, सखाराम शिंदे, पंडित शिंदे यांनी केले आहे.


No comments