Breaking News

आष्टीच्या अन्नतंत्र महाविद्यालयाने आवळया पासून बनवलेले विविध पदार्थाचे माजी आ. धोंडे यांच्या हस्ते अनावरण


आष्टी : येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी यांनी आवळया पासुन बनवलेल्या विविध पदार्थ चे माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

 

यावेळी प्राचार्य साईनाथ मोहळकर यांनी सांगितले की आवळा हे फळ औषधी गुणधर्माने व त्यातील जीवनसत्व 'क' च्या मात्रेमुळे जगभर ज्ञात आहे. औषधी गुणधर्मांबरोबरच त्याचे आहार मुल्यही चांगले आहे. आवळा फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य गरात 700 मि.ग्रॅ.पर्यंत क जीवनसत्व व इतर खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. आवळयावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळाप्राश, आवळा स्क्वॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा फळ सुकवले, शिजवले तरी त्यातील उपयुक्त जीवनसत्वे किंवा औषधी गुणधर्म कमी होत नाही. आवळा फळाची चव अधिक तुरट असल्यामुळे ताजी फळे कमी खाल्ली जातात. आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कॅण्डी, मुरंबा, आवळाकाठी, त्रिफळा चूर्ण, तेल, ज्यूस, चटणी, गोळ्या, चकल्या, पापड, सरबत, गुलकंद, बर्फी असे पदार्थ तयार करण्यात आले आहेत व ते अल्प दरात विक्री साठी अन्नतंत्र महाविद्यालयात ठेवण्यात आली आहेत तरी आष्टी - पाटोदा - शिरूर तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्राचार्य साईनाथ मोहळकर यांनी केले आहे.


No comments