Breaking News

पैठण- पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्थारस्त्यावरील ठीक ठिकाणीच्या खड्यात पाणी  साचल्यानं तळ्याचे आले स्वरूप अपघाताची शक्यता

शिरूर कासार : तालुक्यातील महत्त्वाचा पैठण ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे भर पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून त्या खड्ड्यात पाणी पोचल्यानं या खड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.  खड्यातील पाण्यामुळे वाहनधारकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून वाहनधारकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे. शिरूर तालुक्यातून जाणारा हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे. याच महामार्गावरून पैठण ते पंढरपूर अशी पालखी जाते. या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडले असून खड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे असा प्रश्न वाहनधारकांना पडल्या वाचून राहत नाही. दरम्यान पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पाणी साचून खड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहनधारकांना रस्ता शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, असे असतानाही या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असून जीवघेने खड्डे चुकवताना त्या खड्ड्यात पडून किरकोळ जखमा वाहनधारकांना होत आहेत याकडे राष्ट्रीय बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे किमान उकिर्डा चकला ते पिंपळ्याचीवाडी पर्यंत बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन किमान खड्डे तरी भरून घ्यावेत नसता अपघात होऊन जीव जाण्याची जास्त दाट शक्‍यता आहे वेळेत खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत. 


No comments