Breaking News

उद्धव ठाकरेंची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी - अनिल बोंडेके. के. निकाळजे । आष्टी 

 सत्तेत नसताना बांधावर जाऊन शेतक-यांचा कळवळा असल्याचे जनतेला भासवून शेतक-यांच्या बाजूचे असल्याचा आव आणणारे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेत गेल्यानंतर बदलले असल्याचे राज्याने आता पाहिले आहे त्यामुळे त्यांना मागचे काहीच आठवत नसल्याने त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी झालेली आहे.शेतकरी कुणाच्याही मध्यस्थीने शेतात पिकविलेला माल स्वताः बाजारपेठेत जाऊन विकू शकतो असा शेतकरी हिताचा असलेला कायदाच या राज्य सरकारला कळत नसल्याचा आरोप माजी मंञी तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केला आहे.ते आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथे आयोजित किसान संवाद याञेत बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश धस, प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे,युवानेते जयदत्त धस, संजय आजबे,वाल्मिक निकाळजे, बद्रीनाथ जगताप,शंकर देशमुख आदी उपस्थीत होते.

पुढे बोलताना बोंडे म्हणाले की,नवीन कायदा हा शेतक-यांना स्वातंत्र्य देणारा कायदा असून त्या कायद्याची अंमलबजावणी हे राज्य सरकार करत नाही याचा अर्थ हे सरकार शेतक-यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा हा प्रकार असल्याचेही बोंडे यावेळी म्हणाले.तर आ.सुरेश धस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो शेतकरी हिताचा कायदा आमलात आणला आहे त्याबद्दल मोदींचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून या कायद्यामुळे राज्यातील काही विशिष्ट पक्षातील लोकांची दुकानदारी बंद होत असल्यानेच राज्य सरकार हा कायदा आमलात आणत नसल्याचे म्हणाले.ज्या कायद्याने शेतक-यांची आर्थिक उन्नती होणार आहे ज्यामुळे शेतकरी आणखी जलदगतीने प्रगतीपथावर येईल तो कायदा या राज्यातील ठाकरे सरकारला शेतकरी विरोधी वाटतो हे नवलच म्हणावे लागेल असेही आ.धस म्हणाले.याप्रसंगी रमेश पोकळे,हिरालाल बलदोटा यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रमजान,तांबोळी,हिरालाल बलदोटा,दत्ताञय जेवे,अनिल ढोबळे,रंगनाथ धोंडे,खंडू जाधव,राजेंद्र शिंदे,गणेश शिंदे,माऊली जरांगे, भगवान शिनगिरे,संदिप खाकाळ,अजित घुले,पप्पू खाकाळ,राम धुमाळ,नवनाथ साबळे,काका थेटे,ऋषी खिळे,आदी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक राजू शिंदे यांनी तर आभार भगवान शिनगिरे यांनी मानले.

मोदी,ठाकरेंना पञव्यवहार.... 

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या ऐतिहासिक कृषी बीलाच्या स्वागतार्ह आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी स्वताःच्या हस्ताक्षरात नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणा-या पञांच्या प्रति तर राज्य सरकारने हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पञांच्या प्रति भाजपा किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बोंडे यांना सुपुर्द करण्यात आल्या.


No comments