Breaking News

हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरंट आणि बारला परवानगी


बीड जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेशांना 31 ऑक्टोबर पर्यंत वाढ ; नव्याने काही क्षेत्रांना सशर्त परवानगी - जिल्हाधिकारी राहूल रेखावार 

बीड :  राज्य शासनाने दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्यामूळे बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई, जमावबंदी आदेशात वाढ करण्यात येत असून आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.

  कंटेन्टमेंट झोन मध्ये दिनांक 19 व दिनांक 21 मे 2020 नुसार जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येत असलेले कंटेन्टमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेन्टमेंट झोन तयार करणे विषयी दिलेल्या सर्व सूचना या पुढील आदेशापर्यत कायम राहतील.

जिल्ह्यात प्रतिबंधित बाबी व क्षेत्रे खालील प्रमाणे 

सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, शिकवणी देणा-या संस्था इत्यादी ३१ ऑक्टोंबर २०२० पर्यंत बंद राहतील. तथापि ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. चित्रपत्र गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधीलसह,ऑडीटोरियम, असेंब्ली हॉल या सारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा पुर्णपणे प्रतिबंधित असतील. तसेच  वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी, क्षेत्रे पुर्ववत सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत अस्तित्वात राहतील.

जिल्हयात खालील बाबींना व क्षेत्रांना सशर्त परवानगी


हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरंट आणि बार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२० पासून आस्थापनेच्या क्षमतेच्या ५० % क्षमतेपर्यंत किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषा प्रमाणे सुरु राहतील. सदर आस्थापना सुरू करणेसाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत सविस्तर मागदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस राज्यात व राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या क्रिया, बाबीं नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे (SOP) चालू राहतील. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापना मध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे. सदरील आदेश दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रात्री १२.०० वा पर्यंत लागू राहतील.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुण खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.


No comments