Breaking News

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी

कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाणचा उपक्रम


परळी : 
 
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.      कृष्णनगर(अंबलवाडी) येथे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाण संचलित वृत्तपत्र वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यांनतर गावातील विद्यार्थी , विद्यार्थिनी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.  

     संस्थेचे अध्यक्ष राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी उपसरपंच परमेश्वर काळे, मारूती भास्कर, अक्षय काळे, मंगेश भास्कर,  ऋषिकेश काळे, वर्शिकेत भाकरे, संतोष काळे, संदीप भास्कर, गणेश पोते, अंबादास भास्कर, बळीराम तरकसे, गणेश काळे, संदेश काळकोपरे, अर्जुन भास्कर, करण काळे, अमोल भास्कर, कु.कल्याणी काळे, अक्षरा भास्कर, सोनाक्षी  काळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक तथा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रथमेश भास्कर, शरद भास्कर यांनी परिश्रम घेतले.No comments