Breaking News

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ.रामराव बापु महाराज यांच्या दुःखद निधनामुळे समाज पोरका झाला : बी.एम.पवार


जगदीश गोरे । वडवणी

 देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि बाल ब्रह्मचारी असलेले संत डॉ.रामराल बापु महाराज पोहरादेवीकर यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण बंजारा समाज बांधव पोरका झाला आहे.असे सेवालाल सेनेचे संस्थापकध्यक्ष बी.एम. पवार यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे.

                          

डॉ.रामराव बापु महाराज यांनी सांप्रदायिक पणा जोपासत असतानाच समाजाच्या मुळ प्रश्नाकडे लक्ष दिले.आज देशातील बंजारा समाजाची बिकट अवस्था झाली आहे.त्यात सुधारणा झाली पाहिजे यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले होते.इतर राज्यातील बंजारा समाजाला ST,SC चे आरक्षण मिळाले तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हेच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले होते.

एवढेच नव्हे तर या मागणीसाठी बापुंनी अनेक वेळा आंदोलन केले,तिन-तिन दिवस उपोषणे केली होती.डॉ. रामराव बापु महाराज यांचे काल रात्री दहा वाजता दिर्घ आजाराने दुःख निधन झाले,हि बातमी देशभरात पसरली. यांच्या निधनामुळे राज्यातील आणि देशातील बंजारा समाजाचे आतोनात नुकसान झाले असून बंजारा समाज पोरका झाला आहे बापुच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मगुरू डॉ.रामराव बापु महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना बी.एम.पवार यांनी म्हटले आहे.


No comments