Breaking News

स्वातंत्र्याच्या अभावा मुळे स्त्रियांवर होतायत अत्याचार !

रोज होणारे स्त्रियांवरील  बलात्कार आणि रोज होणारी शेतकरी आत्महत्या याच्या मुळाशी जाऊन आपण  जेव्हा विचार  करतो तेव्हा आपल्या असं लक्षात यायला लागतं की ,आपण ,आपल्या समाजव्यवस्थेने ,आपल्या राज्यव्यवस्था ने इथल्या दोन्हीही सर्जक  घटकांचे स्वातंत्र्य नाकारले आहे. म्हणून स्वातंत्र्याचा अभाव असणे हा खरा स्त्रिंयाचा आणि शेतकऱ्याचा मुख्य सवाल आहे.


आजवरचा इतिहास पाहिल्यास असे लक्षात येतं की शेतीला जो काही 12 हजार वर्षाचा इतिहास आहे त्याला कारणीभूत आहे ती एक स्त्री. ज्या वेळेस स्त्री गर्भवती होती .तिला खाण्यासाठी काही फळे देण्यात आली. तिने त्या फळांच्या बिया आपल्या आजूबाजूच्या जागेत फेकून दिल्या.कालांतराने तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की या बिया पुन्हा उगवून आलेल्या आहेत. यातूनच पुढे शेतीचा शोध लागला. म्हणून खऱ्या अर्थाने शेतीच्या शोधायचं पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते जातं एका स्त्रीला. शेतीच्या शोधाने माणसाच्या जीवनात प्रचंड बदल झाला. मोठी क्रांती झाली. आपली भुक  भागवण्यासाठी व ती पुर्ण करण्यासाठी अन्नाच्या  शोधासाठी असलेली माणसाची भटकण्याची अवस्था शेतीच्या शोधांमुळे आता संपून गेलेली होती.आणि माणूस स्थिर झाला. माणसाच्या जगण्याला एक स्थिर पणा लाभला त्यातूनच पुढे समाज निर्माण व्हायला लागला आणि त्यातूनच ज्याला आपण संस्कृती म्हणतो त्याला समाज म्हणतो ते घटक यानिमित्ताने पुन्हा उदयास आले.  आणि या सर्व गोष्टीच्या मुळाशी जर कोण कारणीभूत असेल तर ती आहे एक  स्त्री. परंतु ,आजच्या परिस्थितीत पाहिलं  तर ज्या स्त्रीने या शेतीचा शोध लावला. माणसाच्या जीवनाला स्थिरता दिली .संस्कृतीला निर्माण केली. माणसाला  स्थिर केलं .

आता आपण दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था पाहू या. या भारतात रोज 43 शेतकऱ्यांची आत्महत्या होते. महाराष्ट्राचा विचार करता 12 ते 13 शेतकऱ्यांची आत्महत्या होते. मराठवाडा आणि  विदर्भ यांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं या दोन भागात शेतकऱ्यांची चिता विझता विझत  नाही.


इथल्या समाजव्यवस्थेच्या , इथल्या धर्म व्यवस्थेच्या  जेव्हा असं लक्षात आलं  की स्त्री एक प्रचंड ताकदवान असणारी व्यक्ती आहे. ती  एक अशी  व्यक्ती आहे ती मुलांना जन्म देऊ शकते .ही ताकद फक्त निसर्गाने तिला बहाल केलेली आहे. तेव्हा मात्र इथल्या धर्मसंस्थेने इथल्या  समाज व्यवस्थेने हळूहळू स्त्रियांवरती  वेगवेगळी बंधने लादायला  लागली .आणि हे  स्त्रियांना सांगू लागले आम्ही तुझं संरक्षण करत आहोत ,तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावरती आहे .पुरुषा  वरती आहे .या पुरुषी मानसिकतेचा  नकळतपणे प्रभावही स्त्रियांवर ती व्हायला लागला. आणि त्यांनी कदाचित असेही मान्य केलेलं असावं असं दिसायला लागतं.आपण शारीरिक दृष्टिकोनातून कमजोर आहोत .आपल्याला संरक्षणाची गरज आहे. मग आपण यांचे थोडे नियम थोडी बंधन स्वीकारली पाळली तर काय अडचण आहे ?  अशी  एक मानसिकता स्त्रियांना अधिकाधिक गुलामी मध्ये जाण्यास कारणीभूत ठरलेली दिसते.तर दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तेंव्हा इथल्या  समाजव्यवस्थेला, इथल्या धर्म व्यवस्थेला, असं लक्षात आलं  इथल्या राजकीय व्यवस्थेला असं लक्षात आलं की शेतीतून उत्पादन होतं शेतकरी असा एक सर्जक आहे जो नवनिर्मिती करतो अन्नधान्याचे उत्पादन करतो आणि शेतीतून अधिक उत्पन्न होण्याची शक्यता ही आहे.गोष्ट इथल्या राज्यव्यवस्थेला लक्षात आल्यानंतर इथल्या बलवान लोकांनी शेती लुटायला सुरुवात केली राजाने तलवारी उपसल्या आणि शेती लुटली ,जाळपोळ केली आणि पुन्हा एकदा  सर्जक असणारा शेतकरी गुलाम बनला .परिस्थितीसमोर हतबल झाला.हे लुटारू, हे राजे लोक शेतकऱ्यांना सांगू लागले, तुला आता जर शेती करायची असेल, तर तुला आमच्या संरक्षणाची गरज आहे. आमच्या संरक्षणाशिवाय तू शेती करू शकत नाही.आणि यासाठी च्या  मोबदल्यात तू आम्हाला काही धान्य देणे लागतो.आणि द्यायलाच  पाहिजे .शेतीच्या लुटीचा एक प्रदीर्घ इतिहास या ठिकाणी सुरू व्हायला लागतो.शेतकरी पुन्हा एकदा येथे हतबल आणि जो सर्जक  आहे.  त्याला शेती करायची असते रोज येणाऱ्या लुटारूंच्या टोळीपासून, राज्यकर्त्यांच्या नाहक त्रासापासून स्वतःला वाचविण्यासाठी त्याने पुन्हा एकदा या सर्व बल शक्तीचा वापर करणाऱ्या व्यक्तीचे  संरक्षण मान्य केलं. त्याचं अस्तित्व मान्य केलं .त्यांची बंधने मान्य केली .आणि नकळतपणे इथूनच शेतीवरती अधिकाधिक बंध.न अधिकाधिक दडपण आणि अशाच प्रकारे शेती व  शेतकरी पुन्हा एकदा आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावून बसलेली आपणाला दिसून येते.

पुढे याच विचारातून धर्मसत्ता पुढे येतेती स्त्रियांच्या डोक्यावरती बसते. शेतकऱ्यांच्या डोक्यावरती बसते.त्यांना  त्यांचं अस्तित्व नाकारावे लागते .त्यांच्यावर ती अधिक अधिक बंधनाला यायला लागतात .आणि त्यांचं एक व्यक्ती म्हणून ,त्यांच असलेलं व्यक्तिमत्व ही व्यवस्था व नाकारणा-या लागते,धर्मव्यवस्था सुद्धा या दोघांचे अस्तित्व नाकारायला  लागते . यांच्यावरती अधिकाधिक बंधन असणे आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागतं. यातूनच ऐतखाऊ लोकांची म्हणजेच बांडगुळांची निर्माण झाली. या ऐतखाऊ लोकांनी शेतीला  लुटण्यासाठी व  स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी  रूढी ,परंपरा यांच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली यांना चार भिंतींमध्ये बंदिस्त केले. याच चार  भिंतींमध्ये चिनुन  मारण्यात आले. एक शब्दसुद्धा बोलण्याची मुभा  या दोन्ही सर्जकांना आता  राहिलेले नाही. आज आपण आजच्या घडीला जरी विचार केला.

 एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत .विज्ञान युगामध्ये आपण आहोत. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आपण आहोत. तरी सुद्धा आपली मानसिकता स्त्रियांकडे पाहण्याची अजूनही प्राचीनतम आहे .मध्ययुगिनच  आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा अजूनही लुटारू पद्धतीचा आहे. शेतीच्या शोषणाचा व  स्त्रियांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन एकच आहे. म्हणून पुन्हा एकदा वारंवार सांगावं लागतं .या दोन्ही घटकांचा मुख्य प्रश्न अडकलेला आहे. तो त्यांना न  दिल्या गेलेल्या स्वातंत्र्य मध्ये आहे. जोपर्यंत आपण या दोन्ही घटकांना स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत या दोन्ही घटकांचे प्रश्न सुटणार नाही.त म्हणून बाकीच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा ,सांगत बसण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एक काम करणं  गरजेचे आहे ते म्हणजे स्त्रियांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा मुक्त स्वातंत्र्य आणि व्यक्ती म्हणून असलेले स्थान मान्य करणं आणि त्यांना राजरोसपणे जीवन जगता येईल निर्भयपणे जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणं हे आपलं  काम आहे .तरच  स्त्रियांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात असं मला वाटतं.


किसान पुत्र श्रीकांत गदळे,  बीड

मो. नं. 7798607054
No comments