Breaking News

चाकूचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग

गौतम बचुटे । केज   

तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे एका महिलेला मोबाईल फोनवरून घरा बाहेर बोलावून ती बाहेर येत नसल्याने ती शौचास जात असताना तिला गाठून विनयभंग केला आणि तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत तोंडावर मारहाण केली.

या बाबतची माहिती अशी की, सारणी (सांगवी) ता. केज येथील एका महिलेला ताडसोन्ना येथील श्रीकांत सज्जन मुंडे याने फोन करून तू घरा बाहेर ये असे म्हणाला. मात्र त्या महिलेने त्या घरा बाहेर यायला नकार दिला. नंतर सायंकाळी ९:३० वा. दरम्यान ते शौचासला बाहेर पडली असता; श्रीकांत सज्जन मुंडे  या आरोपीने तिचा हात धरून तू बाहेर, तू का येत नाहीस? असे म्हणून विनयभंग केला. तीने मोठ्याने आरडाओरड केली तेव्हा आरोपी श्रीकांत सज्जन मुंडे  याने तिला चाकूचा धाक दाखवून तोंडावर बुक्की मारून जखमी केले. 

या प्रकरणी दि.१३ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेने केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी श्रीकांत सज्जन मुंडे याच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४४३/२०२० भा.दं.वि. ३५४ ( ड ) , ३२४, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत. 


No comments