Breaking News

शेतकऱ्यास तात्काळ पीक कर्ज द्या अन्यथा गांधीगिरी करु - शंकर चाटे यांचा बँकेला इशारागौतम बचुटे । केज   

वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना जर तात्काळ पीक कर्ज दिले नाही; तर जय भगवान महासंघाच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करून अन्यायाला वाचा फोडण्याचा ईशारा जय भगवान महासंघाचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकर चाटे यानी दिला आहे.

जय भगवान सेनेचे युवा जिल्हा प्रमुख शंकर चाटे यांनी जिल्ह्यातील  शेतकऱ्यांची पीक कर्जा संबंधी बॅंकांच्या अधिकाऱ्यां कडुन अडवणूक होत आहे. त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी शंकर चाटे यांनी बँकेला एक निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी वर्गास कोरोना सारख्या महामारी व ओला दुष्काळ यामुळे आर्थीक अडचणीला तोंड देण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी सद्या आर्थीक समस्याने खचुन गेलेला आहे. त्यामुळे त्याला आर्थीक मदतीची व पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी बँकेकडे पीक कर्ज मागणीसाठी खेटे घालीत आहेत.

 परंतु बॅकेचे आधिकारी व कर्मचारी यांच्याकडुन शेतकऱ्यास पीक कर्ज पुरवठा करण्यास होणारी चालढकल व दिवसांदिवस चालु असलेला मुजोरीपणा यामुळे पीक कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी वेळ काढुपणा चालु असलेचे दिसुन येत आहे. वडवणीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा या शाखेकडुन शेतकऱ्यांच्या पीक कर्ज प्रकरणासाठी आवश्यक ती तरतुद करून त्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा. बँकेकडुन पीक कर्ज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास गांधीगीरी पद्धतीने संबंधित शाखाधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येईल आणि होणाऱ्या सर्वस्वी परिणामास बँक व अधिकारी जबाबदर असतील असा ईशारा दिला आहे.


No comments