Breaking News

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परळीच्या देशमुख महाविद्यालयात पालिकेने केली निर्जंतुकिकरण फवारणी

 


परळी वैजनाथ : 
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेला शुक्रवार (ता.०९) पासून सुरुवात होत असून येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयात परिक्षेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. आँफलाईन परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्कसह योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. रेखा परळीकर यांनी केले आहे.

                  

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या बीए.बीकाँम, बीएस्सी परिक्षेस शुक्रवार पासून सुरुवात होत असून कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरलक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच ही परिक्षा आँनलाईन व आँफलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना देता येणार असून आँफलाईन म्हणजे महाविद्यालयात येवून परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घ्यावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क,सँनेटायझर, स्वतः ची पाण्याची बाँटल घेऊन यावे, शारीरिक अंतर पाळावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा परळीकर यांनी केले आहे.No comments