Breaking News

बौद्ध विहार रस्ता घाणीसह आतिक्रमणाच्या विळख्यातदिल्ली, मुंबई व ईतर राज्यातील प्रकरणी रस्त्यावर  मग गावातील अन्याय अतिक्रमण  प्रकरणी भिम सैनिक गप्प का. . ? 

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 

दिंद्रुड येथील वार्ड क्रमांक दोन भीम नगर येथील  राजरत्न बौद्ध विहारा कडील मुख्य रस्ता  अतिक्रमणासह  घाणीच्या विळख्यात सापडलेला आहे. तरूण युवक भिम सैनिक हा फेसबुक,  वाॅटसअप च्या  माध्यमातून चर्चा मध्ये राहून दिल्ली, मुंबईच्या  व ईतर राज्यातील अन्याय अत्याचार झाल्यावर निषेध व्यक्त करून, आंदोलन करून  चळवळीची भाषा करतो आणि ते करायला पण पाहीजे . पण गावातील गल्लीतील समाजातील अन्याया विरोधात सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. सार्वजनिक  रस्त्यावर आतिक्रमण करणाऱ्यांला भिऊन व गाव गुंडांना भीउन जगायचे का. . ?  समाजावर अन्याय झाला की गप्प  बसतो. खंडीभर पक्ष संघटनांनी पदानी भूषविलेले युवानेते, कार्यकर्ते कोणीच आवाज उठवत नाहीत. 

एक ना धड भाराभर चिंध्या आशी गत कार्यकर्त्यांची झाली आहे . भीम नगर येथील अंगणवाडी सह राजरत्न बौद्ध विहार ही घाणीच्या विळख्यात सापडलेले आसतांना मुख्य रस्ता आतिक्रमणाने गीळला आहे. महामानवाच्या जयंत्या, मुला बाळाचे लग्न सामाजिक कार्य करण्यास व बाहेरील पाहुणे यांच्या येणार्‍या ए जा करणाऱ्या  गाड्यास आडचण होत आहे.  एका कुटुंबेने तीन वर्षांपूर्वी पंचायत समिती समोर दोन दिवस आमरण उपोषण करून या  रस्त्यावरील आतिक्रमण काढले होते. परत त्याच रस्त्यानवर पुन्हा  अतिक्रमण करून निराधार महिला दलित बांधवांच्या घरा समोरील आंगनावर  व रस्त्यावर ताबा करून अतिक्रमण केले आहे. 

राजरत्न बौद्ध विहारा कडील रस्ता आतिक्रमणासह घाणीच्या विळख्यात गेला आहे. शासन फंडा द्वारे आनेक वेळा  दलित वस्ती सुधार योजना साठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.  परंतु संबंधित गुत्तेदार अभियंता व पुढारी  विकासाच्या नावाखाली थातूरमातूर कामे करून पैसे खर्च करून बोगस पद्धतीने कामे केली आहेत  गेल्या कित्येक वर्षांपासून या वार्डात एकही नाली नसल्याने सांडपाणी राजरत्न बौद्ध विहारा समोर साचते आहे. ग्रामपंचायतची विकास कामाची उदासिनता व समाजाची मानसिकता या मुळे दलितवस्ती तील विकास कामे खुंटले आहे. गल्लीत रस्त्यावर  आतिक्रमण करणाऱ्यानी माज घातला आहे. गुंड प्रवृतीची माणसे  वाढली आहे.  भिम सैनिकांनो जागे व्हा आन्यायाला विरोध करण्यासाठी एक व्हा.


No comments