Breaking News

वीज पडून ४५ वर्षीय शेतकरी ठार

शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील घटना


शिरूर कासार : तालुक्यातील बावी येथील ४५ वर्षीय शेतकरी शनिवारी सायंकाळच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये वीज पडून ठार झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील आजिनाथ सदाशिव खेडकर वय ४५ वर्षीय शेतकरी शेतात काम करीत असताना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याचा पावसामध्ये वीज पडून मयत पावला आहे घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत रायमोहा ग्रामीण रुग्णालयांमध्ये हलवले होते.


No comments