Breaking News

त्या जातीवादी समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा- सुहास पगारेभीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे आष्टि पोलीस निरीक्षक यांना निवेदन

 के. के. निकाळजे । आष्टी  

बर्दापूर ता. अंबाजोगाई जिल्हा बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना  करण्यात आली आहे.

ही घटना निंदनीय असून फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये जातिवाद पसरण्याचं कट-कारस्थान जातीवादी लोक करत आहेत अशा लोकांना तात्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने आष्टी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली. या घटनेचा भीमशक्ती रिपब्लिकन सेना आष्टी तालुका जाहीर निषेध करण्यात आला असून महाराष्ट्रात आशा घटना वारंवार होऊ  नये म्हणून याची वेळीच दखल घ्यावी नसता  भीम  शक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष सुहास छगन पगारे शुभम शिंदे,  प्रतीक पवार, अवी सातपुते,  अजय काळोखे, संदेश निकाळजे, शिशुपाल साळवे,  तुषार निकाळजे,  अवि सावंत,  प्रमोद निकाळजे, गौरव निकाळजे,  प्रतीक साळवे,  सागर सावंत, अमर शिंदे,  शाहरुख खान,  प्रशांत खंडागळे,  बुद्धभूषण पवार, अनिकेत निकाळजे इत्यादींच्या सह्या आहेत.


No comments