Breaking News

मोनाली - प्रदीप यांचा साखरपुडा उत्साहात


माझ्या मुलींनी उच्च शिक्षण घेतल्याचे समाधान वाटते - फुलचंद कराड

परळी : भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची कन्या चि. सौ. का. मोनाली फुलचंद कराड  व चि.प्रदीप मारोतीराव आंधळे रा.येळंब यांचा साखरपुडा नुकताच उत्साहात पार पाडला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे आ.संजय दौंड यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नातेवाईक उपस्थित होते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोजकेच निमंत्रण देण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वागत फुलचंद कराड यांनीं केले. यावेळी सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासोबत प्रत्येकांनीच मास्क वापरला होता. दरम्यान माझ्या चारही मुली उच्चशीक्षीत असून त्यांनी कुटुंबात फारसे शिक्षण नसतांनाही घेतलेली शैक्षणीक झेप मला समाधान देत आहे असे सांगून माझे सर्व जावई सुद्द्धा उच्च शिक्षित असल्याचे फुलचंद कराड म्हणाले.

         

भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची कन्या चि. सौ. का. मोनाली फुलचंद कराड  व चि.प्रदीप मारोतीराव आंधळे रा.येळंब यांचा साखरपुडा आर्य वैश्य सभागृहात उत्साहात पार पाडला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकांना मास्क देण्यासोबतच संपूर्ण  सभागृह सॅनिटाईझ करण्यात आले होते. याप्रसंगी कौटुंबिक पद्धतीने उभयतांचा साखरपुडा पार पडला. फुलचंद कराड व मारोतीराव आंधळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 याप्रसंगी नियोजित वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, आ.संजय दौंड, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष नीलकंठ चाटे, वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव,नगरसेवक शरद मुंडे.रामेशवर मुंडे नगरसेवक शरद मुंडे, प्रा.पवन मुंडे, सूर्यभान मुंडे, जीवराज ढाकणे, जुगलकिशोर लोहिया, उद्योजक अशोक भाला, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, डॉ.राजाराम मुंडे, यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, व्यापारी आदींसह दोन्ही परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

         मुलींच्या शिक्षणाचा अभिमान

आमच्या कुटुंबात कोणीही फारकाही शिकलेले नाहीत. परंतु माझ्या चारीही मुलींनी शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अवाहन मी पूर्ण करू शकलो असे सांगत फुलचंद कराड म्हणाले की, माझ्या मुलींनी उच्च शिक्षण घेतले आहे. कुटुंबाला नवा शैक्षणिक वारसा त्यांनी प्रदान केला आहे. माझे सर्व जावई हे सुद्धा उच्चशिक्षित असून मला या सर्वांचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले. दरम्यान कोरोना संपल्यानंतर माझ्या मुलीचा विवाह आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करणार असून माझ्यावर असलेले प्रेम असेच कायम ठेवा असेही आवाहन फुलचंद कराड यांनी यावेळी केले.


No comments